Sunday, February 05, 2012

चिनू आणि अनु

चिनू .. आमची चिनू एवढसं बाळ आहे .. अजुन १.५ महीने पण नाही झाले तिला.. पण सगळयांना नाचविते :)
आमच्या समोर एक छोटीशी ताई आहे तिची .. तिचा नाव अनु .. ती आहे १.२५ वर्षाची .. एवढसं बाळ हे तिनेच दिलेलं नाव ! तसं अनु चिनू ला "छोत छोत बाळ" सुद्धा  म्हणते ! 
तर गम्मत अशी झाली .. की आमची चिनू १ महिन्याची झाल्यावर तिच्या आई बरोबर आजोळी  गेली.. घर सुनं  सुनं झालं.. आम्हाला करमेना..तिच्या रडण्याचा भास पण व्हायचा .. दूसरा दिवस उजाडला ..आम्ही आपापल्या कामात होतो.. अनु आली विचारत "बाळ ? बाळ ?" मी सांगितला तिला " बाळ भुर्र गेलं "  तिला पटेना.. 
"बाळ कुठे ? बाळ .. बाळ .. " करत ती गेली आतल्या खोलीत जिथे ती आधी बाळ बघायला जायची.. बाळ दिसलं नाही. जरा हिरमुसली .. मग तिने सगळीकड़े शोधला .. पलंगावर ..छोट्या टी-पॉय वर .. टेबल वर अणि कमी पडलं तर तिने बाथरूम मधे पण शोधून झाला .. मग तिच्या आईने तिचा समाधान केला..तू कशी आजी कड़े जाते तसं बाळ पण आजी कड़े गेला.. पण आम्हाला कही ते पटेना..
तीसरा दिवस, पुन्हा तेच "बाळ.. बाळ " करत शोधायचा अणि नाराज होउन जायचा.. ३-४ दिवसांनी तिने बहुतेक स्वतःची समजूत घालून घेतली.. आणि तिच्या समजुतीने आम्ही थक्क झालो..

ती अजुनही तशीच येते "बाळ.. बाळ .." करत एवढंच की जाताना म्हणते "बाळ ऑफिस ला गेलं " !!!!!

आता चिनू बाळ परत येऊ पर्यंत अनु ताई जाइल भुर्र उडून अमेरिकेला .. आणि परत येऊ पर्यंत विसरुन देखिल जाइल बाळ कोण ते .. पण आम्हा मोठ्यांना मात्र ही गम्मत नक्कीच लक्षात राहिल !!