असतो तो आसपास , इतरांसारखा. फार वेगळा नाही वाटंत. कोणाचा लक्ष सुद्धा जात नाही आणि कोणी ओळख पण दाखवत नाही
ग्रीष्म आला की मात्र याला धुमारे फुटतात आणि हळु हळु आपण त्याला बघू लागतो - कारण आपल्या लक्षात आलेलं असतं की अंगाची लाही लाही करणार्या वैशाख वणव्यातुन तावुन सुलाखून , सुर्यालाही लाजवणारी लाली पहरून आश्चर्यचकित करणारा हा गुलमोहर असतो
No comments:
Post a Comment