Showing posts with label Devanagari. Show all posts
Showing posts with label Devanagari. Show all posts

Saturday, July 30, 2016

Making it up on the go..

It was just a trial..  To #rhyme up a rhyme based on #Devanagari letters.. #Konkani being my mother tongue, it was easier..so here is my creation..
Mind it, there is not much poetic value, it's for kids and hence simple and since its mine,  it sounds sweet to me

क क कमळ, ख खयि दोक्कुनु हाडोया
ग ग गणपती बाप्पाक घ घ घराकडे हाडनु चोढोया
च च चवथीक छनछन् कोरनु येत्तलो,
जय देव जय देव करुया अनि झोकालीरी झुलोया।
टण टण करता घांट ठण ठण करता जघांट
डमडम करता डमरू अनि ढमढम ढोल वाज्जोया ।
पार्वतीले फुल्लाक,बमबम भोले ल बाब्बाक
म म मोदकाचे नैवेद्य करुया ।
ताट करी जेवणाचे थाट करी ताटाचे दया करी आम्चेरी
ध ध पाय धरुया।
न न नमन आम्मी तुक्का करताती, यो रे यो लवकरी,
वयि आम्मी तुक्का शरण आयिली।
सुख अनि समाधान, षण्मुखाले आशिर्वाद,
हे देवा क्षमा करी ज्ञान अभय दी आम्का!

Wednesday, March 21, 2012

तुझी आठवण

पावसाच्या थेंबांनी मन भरून टाकलंय तुझ्या ओंजळीत रितं करण्यासाठी
पण तू कुठे आहेस माझी ओंजळ भरण्यासाठी ?
गार वाऱ्याने फुलवून टाकलंय मला,
तुझ्या आठवणीसारखा तूच पाठवलं आहेस का त्याला तुझ्या निरोपासाठी?

तुझी आठवण पावसासारखी येते
चिंब भिजवून मोहवून टाकते
आणि मग मी पुन्हा वाट पाहते
अजुन एक सरी साठी........

(These are created a long time back when the first rains had brought the beautiful smell of the earth.. posted only now..)

Sunday, February 05, 2012

चिनू आणि अनु

चिनू .. आमची चिनू एवढसं बाळ आहे .. अजुन १.५ महीने पण नाही झाले तिला.. पण सगळयांना नाचविते :)
आमच्या समोर एक छोटीशी ताई आहे तिची .. तिचा नाव अनु .. ती आहे १.२५ वर्षाची .. एवढसं बाळ हे तिनेच दिलेलं नाव ! तसं अनु चिनू ला "छोत छोत बाळ" सुद्धा  म्हणते ! 
तर गम्मत अशी झाली .. की आमची चिनू १ महिन्याची झाल्यावर तिच्या आई बरोबर आजोळी  गेली.. घर सुनं  सुनं झालं.. आम्हाला करमेना..तिच्या रडण्याचा भास पण व्हायचा .. दूसरा दिवस उजाडला ..आम्ही आपापल्या कामात होतो.. अनु आली विचारत "बाळ ? बाळ ?" मी सांगितला तिला " बाळ भुर्र गेलं "  तिला पटेना.. 
"बाळ कुठे ? बाळ .. बाळ .. " करत ती गेली आतल्या खोलीत जिथे ती आधी बाळ बघायला जायची.. बाळ दिसलं नाही. जरा हिरमुसली .. मग तिने सगळीकड़े शोधला .. पलंगावर ..छोट्या टी-पॉय वर .. टेबल वर अणि कमी पडलं तर तिने बाथरूम मधे पण शोधून झाला .. मग तिच्या आईने तिचा समाधान केला..तू कशी आजी कड़े जाते तसं बाळ पण आजी कड़े गेला.. पण आम्हाला कही ते पटेना..
तीसरा दिवस, पुन्हा तेच "बाळ.. बाळ " करत शोधायचा अणि नाराज होउन जायचा.. ३-४ दिवसांनी तिने बहुतेक स्वतःची समजूत घालून घेतली.. आणि तिच्या समजुतीने आम्ही थक्क झालो..

ती अजुनही तशीच येते "बाळ.. बाळ .." करत एवढंच की जाताना म्हणते "बाळ ऑफिस ला गेलं " !!!!!

आता चिनू बाळ परत येऊ पर्यंत अनु ताई जाइल भुर्र उडून अमेरिकेला .. आणि परत येऊ पर्यंत विसरुन देखिल जाइल बाळ कोण ते .. पण आम्हा मोठ्यांना मात्र ही गम्मत नक्कीच लक्षात राहिल !!

Saturday, May 29, 2010

तो

असतो तो आसपास , इतरांसारखा. फार वेगळा नाही वाटंत. कोणाचा लक्ष सुद्धा जात नाही आणि कोणी ओळख पण दाखवत नाही
ग्रीष्म आला की मात्र याला धुमारे फुटतात आणि हळु हळु आपण त्याला बघू लागतो - कारण आपल्या लक्षात आलेलं असतं की अंगाची लाही लाही करणार्या वैशाख वणव्यातुन तावुन सुलाखून , सुर्यालाही लाजवणारी लाली पहरून आश्चर्यचकित करणारा हा गुलमोहर असतो

Tuesday, June 30, 2009

Katti - Batti

आरगट्टी बारगट्टी तुझ्याशी कट्टी फू !
तुला मी खेळात घेणार नाही , चॉकलेट गोळ्या देणार नाही ,
आलास तर घेइन गाल गुच्चा अंगावर सोडीन भू !!
झुकझुक गाडी, पमपम गाडी , शेतावरची हम्मा गाडी ,
आम्ही सगळे जाऊ भूर , एकटाच राहशील तू !!!

Something that I remembered from my childhood when I read a post by a friend who wrote about her concepts as a kid...